अमरावतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अमरावतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सर्वच महिला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. अमरावतीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेसाठी कागदपत्रं काढण्यासाठी आलेल्या महिलांची लूट होत असल्याचे दिसत आहे. महिलांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून वरुड तालुक्यातील सावंगी तलाठी कार्यालयातील हा प्रकार आहे. महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेकडून 50 रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, ही जी योजना आहे त्याला 46 हजार कोटी रुपये लागणार आहेत. सरकारचं मत काय असावं निवडणुका होईपर्यंत दोन ती महिने आपण फक्त महिलांना पैसे देऊ आणि नंतर हात आकडता घेऊ असं कुठेतरी आहे. महिला एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथे जर पैसे घेतलं जात असतील नाव नोंदवायला मग भ्रष्टाचार किती लेव्हलला या सरकारच्या काळामध्ये गेला आहे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे आम्ही या योजनेचं स्वागत करतोच पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे. ज्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे पैशाचे नियोजन केलं गेलं. तेसुद्धा अपुरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com