Rohit Pawar : राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar : राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; रोहित पवार म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही,

पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com