पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये एका खेकड्याला लटकवून त्याचा गैरवापर केल्याचा निषेध दर्शवत ‘पेटा इंडिया’कडून कारवाईची मागणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर संस्थेने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र पाठविले आहे. पेटाकडून रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

‘पेटा इंडिया’ या प्राणी संस्थेने रोहित पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com