'खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' रोहित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. यातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या मतदारसंघात जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाटेगाव येथे घेण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले रोहित पवार?
एकीकडे पंतप्रधान म्हणायचे की वन नेशन वन इलेक्शन मात्र तुम्ही जम्मू काश्मीर, हरियाणा घेता आणि महाराष्ट्राला मागे ठेवता त्याचं आम्ही काय समजायचं. एका बाजूला तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असचं म्हणावं लागेल, कारण महाराष्ट्रावर दुजाभाव झाला आहे. निवडणुका आत्ता व्हायला पाहिजे होत. यांनी निवडणुका पुढे जरी ढकलले असले तरी महायुतीचे दहा आमदार कमी होतील अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
अमरावतीमध्ये शिंदे गटाचे नानकराम नेभनाणी यांनी तसेच अनिल बोंडे यांनी महिला सुरक्षित नसल्याच्या कारणावरून बंदूक वापरण्याचा परवाना मागितला आहे. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आणि आता सत्तेत असलेल्या आमदारालाचं असे वाटत असेल तर बघा महाराष्ट्राची काय परिस्थिती झालेली आहे. त्याचं बरोबर त्यांच्या खासदार की माझी खासदार म्हणत आहे त्यांना बंदूक पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात त्यांना देखील सुखरूप वाटत नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आम्ही आधीपासून म्हणतं आहे. महिला सुरक्षित नाही आता नेतेही सुखरूप नाही त्यामुळे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशी म्हणायची वेळ आली आहे.
संजय शिरसाठ यांच्यावर टीका करत म्हणाले की, मंत्री पद मिळेल या अपेक्षेने तुम्ही जे जॉकेट बनवलं होत, ते पुढच्या पाचवर्षात तरी ते जॅकेट तुम्हाला वापरता येणार नाही.वजन जरा कंट्रोल मध्ये ठेवा बराच काळ आहे. तुम्हाला जैकेट मिळण्यासाठी त्यामुळे बंद आड चर्चा हे कशासाठी आणि कोणासाठी होते. हे बघण्यापेक्षा अनेक बीजेपीचे नेते महाविकास आघाडी आणि शरद पावराच्या राष्ट्रावादीत येताना आपण पहाल येत्या 3 तारखेला सोलापूर मध्ये बीजेपीला मोठं भगदाड पडलेला आपल्याला पहायला मिळेल.अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
देशाचे पंतप्रधान मोदी हे आज जळगाव दौऱ्यावर होते त्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी दौऱ्यावर आहे म्हणजे दोन महिन्यात निवडणुका लागतील मात्र महाराष्ट्र मध्ये महिला सुरक्षा परिस्थिती हालखीची आहे. तुम्ही प्रमुख आहे त्यामुळे तुमच्या महाराष्ट्रातील त्या विभागाच्या नेत्याचे कान धरले पाहिजे की नाही.ते फक्त राजकीय स्टेटमेंट देत आहे.सगळीकडे फिरत आहे त्यामुळे त्यांनी त्या नेत्यांचे कान पकडले पाहिजे.तसेच जो शक्ती कायदा आहे ते केंद्र सरकारने साध्या करणामुळे परत पाठवून दिलं आहे.त्यामुळे हे पाहून भीती वाटते आणि हे सरकार महिलांच्या विरोधातील सरकार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
भाजपने गेल्या काही काळात महाराष्ट्राचा अवमान केला आहे.महाराष्ट्रात जेव्हा बीजेपीचं सरकार येतं तेव्हाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुजरातचा विकास होतो.सत्तेत बसतात महाराष्ट्राच्या मतांवर आणि मदत करतात गुजरातची. त्यामुळे गुजरातचे नेते जे दिल्लीत बसले ते घाबरतात कारण महाविकास आघाडी सरकार आता राज्यात येणार आहे आणि ते महाराष्ट्राचा विचार करणार गुजरातचा नाही हे टेंशन त्यांना आला असावं त्यामुळे काही केलं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.