Rohit Sharma, IPl 2024
Rohit Sharma, IPl 2024

MI vs DC : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, गोलंदाजांची धुलाई करून IPL मध्ये केला 'हा' मोठा विक्रम

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला.
Published by :

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा दिल्लीच्या संघाविरोधात या लीगमध्ये १००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने दुसऱ्यांदा एखाद्या संघाविरोधात १ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. रोहितने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. आयपीएलमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर रोहित ४९ धावांवर बाद झाला.

रोहित शर्माने १४ व्या चेंडूवर एक धाव काढली आणि तो २३ धावांवर पोहचला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरोधात एक हजार धावा करण्याच्या आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माची नोंद झाली. १४ चेंडूत रोहितने २ चौकार आणि २ षटकार ठोकून २३ धावा केल्या होत्या. याचदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६४ पेक्षा जास्त होता.

रोहितने कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधातही असा कारनामा केला आहे. केकेआरविरोधात रोहितने एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. हिटमॅन रोहितने या सामन्यात २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीनं ४९ धावा केल्या. रोहितने या सामन्यात १८८.४६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com