ताज्या बातम्या
Avaada Company : 'त्या' 14 जणांनी कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले; तब्बल 12 लाख घेऊन पसार झाले
चोरीच्या प्रकारानंतर केज पोलिसांकडून अवादा कंपनीच्या प्लॅन्टला 20-25 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मस्साजोग येथील आवादा कंपनीत चोरी झाली असून कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून 14 लोकांनी तब्बल 12 लाख 87 हजारांचे साहित्य चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविषयी त्या ठिकाणी रात्री कर्तव्यावर असलेले शिपाई यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर केज पोलिसांकडून आवादा कंपनीच्या प्लॅन्टला 20-25 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आवादा कंपनी चर्चेत आली. याच कंपनीच्या आवारात संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्या टोळक्यांमध्ये तू-तू, मैं-मैं झाली होती. हे प्रकरण वाढून पुणे कटकारस्थान करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती.