Mohan Bhagwat
Mohan Bhagwat Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : RSS प्रमुख मोहन भागवत यांचे लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मोठं विधान म्हणाले की....

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी कुटुंब आणि लग्नाच्या महत्त्वावर भाष्य केलं आहे. त्यांच्या मते, कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक समाधानाचं साधन नाही, तर समाजाची एक महत्त्वाची युनिट आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी कुटुंब आणि लग्नाच्या महत्त्वावर भाष्य केलं आहे. त्यांच्या मते, कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक समाधानाचं साधन नाही, तर समाजाची एक महत्त्वाची युनिट आहेत. मोहन भागवत कोलकत्त्यात झालेल्या RSS च्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यात त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

त्यांनी सांगितलं की, "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. कुटुंब ही एक महत्त्वाची संस्था आहे, जिथे एक व्यक्ती समाजात कसं वागायचं हे शिकतो. कुटुंब आणि लग्न हे फक्त शारीरिक आनंदासाठी नाही, तर त्या माध्यमातून समाजातील मूल्यं मिळवली जातात."

कुटुंब आणि संस्कृती

मोहन भागवत यांचे म्हणणे आहे की, कुटुंब हे संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. कुटुंबामध्ये अनेक मूल्यं शिकली जातात आणि तेच आपल्या समाजाला आकार देतात. कुटुंबाच्या माध्यमातूनच आर्थिक गोष्टी देखील व्यवस्थापित केल्या जातात. बचत, सोनं, इत्यादी गोष्टी कुटुंबातच सुरू होतात. कुटुंब ही सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संस्था आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपवर प्रतिक्रिया

लिव्ह-इन रिलेशनशिप बद्दल बोलताना मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार नसाल, तर ते योग्य नाही. हे एक अशी परिस्थिती आहे, जिथे लोक एकत्र राहतात पण नात्याच्या जबाबदारीला पूर्णपणे स्वीकारत नाहीत." त्यांच्या मते, कुटुंब ही एक असंस्था आहे जी मूल्य आणि जबाबदारी शिकवते.

मुलांची संख्या आणि आदर्श कुटुंब

मोहन भागवत यांनी कुटुंबातील मुलांची संख्या यावरही आपली मते व्यक्त केली. त्यांना असं म्हणायचं आहे की, मुलांची संख्या ठरवण्याचं कोणतंही ठराविक फॉर्म्युला नाही. परंतु, विविध अभ्यासांवर आधारित असं सांगण्यात आलं आहे की, तीन मुलं असणं हे आदर्श असू शकतं. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, लग्नाचं वय साधारणतः 19 ते 25 वयाचं असू शकतं.

ईगो मॅनेजमेंट आणि कुटुंब

भागवत यांचे म्हणणे आहे की, जेव्हा कुटुंबात तीन मुलं असतात, तेव्हा मुलं आणि आई-वडील यांच्या संबंधात ईगो मॅनेजमेंट शिकण्याची संधी मिळते. तीन मुलं असताना कुटुंबाची सामंजस्यपूर्ण कार्यशैली तयार होते, जे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे.

लोकसंख्या आणि तिचं महत्त्व

मोहन भागवत यांनी लोकसंख्येच्या संदर्भात देखील भाष्य केलं. त्यांच्या मते, लोकसंख्या एक ओझं असू शकतं, पण ती एक संपत्ती देखील आहे. त्यांना असं वाटतं की, या संदर्भात पर्यावरण, सुविधा, महिलांच्या स्थिती आणि देशाच्या गरजा लक्षात घेऊन एक दीर्घकालीन धोरण तयार करायला हवं.

यांच्या मते, कुटुंब ही एक महत्त्वाची संस्था आहे जी समाजातील प्रत्येक व्यक्तीला मूल्य आणि संस्कृती शिकवते. त्यामुळे, कुटुंब आणि लग्न यांना एक आदर्श आणि जबाबदारी असलेल्या भूमिकेत ठेवणं आवश्यक आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com