Government Decision : 'या' 8 गोष्टीच्या नियमांमध्ये होणार 1 जूनपासून बदल; सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर ठरतील परिणामकारक

Government Decision : 'या' 8 गोष्टीच्या नियमांमध्ये होणार 1 जूनपासून बदल; सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर ठरतील परिणामकारक

नवीन महिन्याची सुरूवात काही नवीन बदलांनी होणार आहे. राज्य सरकारच्या निर्यणांनुसार सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात या बदलांमुळे मोठे परिणाम होणार आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

नवीन महिन्याची सुरूवात काही नवीन बदलांनी होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्यणांनुसार सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात या बदलांमुळे मोठे परिणाम होणार आहेत. 1 जून 2025 पासून अनेक आर्थिक आणि वापरकर्ता-सेवेशी संबंधित 8 मोठे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँक, एफडी, क्रेडिट कार्ड, एलपीजी गॅस, पीएफ काढणे, एटीएम आणि म्युच्युअल फंडमध्ये आधार अपडेट करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.

UPI, PF, LPG च्या नियमांमध्ये हे बदल?

1. सरकार EPFO 3.0 लाँच आवृती लाँच करण्याची शक्यता, यामुळे तुमचा PF क्लेम खूप सोपा होईल

2. मोफत आधार अपडेट सुविधा संपली, आधार अपडेटसाठी 50 रूपये निश्चित

3. कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास 2 टक्के बाउन्स शुल्क

4. सीएनजी-पीएनजी आणि एटीएफच्या किमतीत बदल होण्याची शक्यता

5. 19 किलो व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती प्रति सिलिंडर 17 रुपयांपर्यत कमी करण्यात आल्या.

6. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. आणखी कपात अपेक्षित आहे

7. सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी लागू केलेला नवीन कट-ऑफ वेळ लागू होणार

8. UPI पेमेंट करताना, वापरकर्त्याला फक्त बँकिंग नाव दिसेल, QR कोड, संपादित दिसणार नाहीत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com