Rupali Chakankar On Satara Doctor Case : फोटोवरून मोठा वाद, रात्रभर प्रशांतला तिचे मेसेज, एकमेकांची तक्रार, तीनवेळा बदली अन्.., डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा!

Rupali Chakankar On Satara Doctor Case : फोटोवरून मोठा वाद, रात्रभर प्रशांतला तिचे मेसेज, एकमेकांची तक्रार, तीनवेळा बदली अन्.., डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा!

सातारा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिला डॉक्टरबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यात त्यांनी एकमेकांची तक्रार, तीनवेळा बदली, आरोपींशी तिचा संवाद, फोटोवरून मोठा वाद, रात्रभर प्रशांतला तिचे मेसेज आल्याचा तसेच अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केलं.
Published on

सातारा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय सध्या राज्यभरात गाजत आहे. साताऱ्यातील या घटनेने राज्यभराला हादरलं आहे. आता विषय राजकारणात देखील गाजत आहे. अनेक राजकीय प्रतिक्रिया या प्रकरणावर पडल्या आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

यावेळी डॉक्टर आणि पोलीस या दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार केल्याचा मोठा खुसाला रुपाली चाकणकर यांनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, "पोलीस आणि डॉक्टर यांनी एकमेकांविरोधातील तक्रार होती. आयसी कमिटीकडे डॉक्टराची तक्रार नव्हती. चौकशी समितीने ही तक्रार निकाली काढली होती. पोलिसांची फिट अनफिटची तक्रार होती.

"पेशंटला उशिरा तपासण्याची पोलिसांची तक्रार होती, तर रात्रीच्यावेळी पेशंट आणले जातात. अनफिट केलं जातं असं या डॉक्टर महिलेची तक्रार होती. तीनवेळा बदली करण्यात येत होती. पण या डॉक्टर महिलेने फलटणच हवंय म्हणून सांगितलं होतं. पोलिसांनी सीडीआर काढला. गोपाल बदनेशी जानेवारी ते मार्चपर्यंत संवाद झाला. त्यानंतर संवाद नाही".

"प्रशांत बनकर सोबत संवाद होता. लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या. फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला. भांडण झालं. त्यानंतर त्या घरातून निघाल्या. बनकरच्या वडिलांनी तिला समजावलं. त्यानंतर ती हॉटेलला गेली. तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले. त्याचा फोन बंद होता. मी आत्महत्या करेल वगैरे मेसेज केले होते. यापूर्वीही तू आत्महत्येची धमकी दिली होती, असं प्रशांतने तिला म्हटलं होतं. " असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com