Russia
Russia Russia

Russia : रशियाचे पाकिस्तानवर मोठे दडपण: ISI गुप्तचरावर कारवाई

रशियाने पाकिस्तानच्या ISI गुप्तचर संस्थेच्या एका सदस्याला अटक केली आहे. हा गुप्तचर रशियाच्या प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची चोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामध्ये S-400 क्षेपणास्त्र आणि हेलिकॉप्टर तंत्रज्ञानाचा समावेश होता.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • भारत आणि रशियाचे संबंध काही दिवसांपासून बदलत आहेत.

  • त्यामध्ये अमेरिकेचा मोठा दबाव भारतावर आहे

  • ज्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करणे टाळण्याचे निर्देश भारताला दिले जात आहेत.

भारत आणि रशियाचे संबंध काही दिवसांपासून बदलत आहेत, त्यामध्ये अमेरिकेचा मोठा दबाव भारतावर आहे, ज्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करणे टाळण्याचे निर्देश भारताला दिले जात आहेत. अशा स्थितीत, रशियाने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे.

रशियाने पाकिस्तानच्या ISI गुप्तचर संस्थेच्या एका सदस्याला अटक केली आहे. हा गुप्तचर रशियाच्या प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची चोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामध्ये S-400 क्षेपणास्त्र आणि हेलिकॉप्टर तंत्रज्ञानाचा समावेश होता. रशियाने या कारवाईत S-400 च्या तंत्रज्ञानाच्या गुप्त कागदपत्रांची तस्करी होण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीला अटक केली आणि त्या कागदपत्रांचा जप्ती केली.

भारताच्या सुरक्षेसाठी रशियाची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पाकिस्तानने भारताच्या हद्दीमध्ये S-400 क्षेपणास्त्र प्रवेश करू दिला नाही, यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारताच्या हवाई दलाकडे सध्या तीन S-400 युनिट्स असून, भारत आणखी यांचे खरेदी करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे पाकिस्तानवर तणाव आणखी वाढला आहे. भारत आणि रशिया यांचे संबंध अनेक वर्षे चांगले होते, पण अमेरिकेच्या दबावामुळे या संबंधात काही बदल झाले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असतानाही, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com