Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर; आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vladimir Putin) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा भारत दौरा कालपासून सुरू झाला आहे. 4 आणि 5 डिसेंबरला पुतिन यांचा दोन दिवस भारत दौरा असणार असून दोन दिवसांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादलेले असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्याच्याआधी रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने, स्टेट ड्यूमाने मंगळवारी भारतासोबतच्या लष्करी कराराला औपचारिक मान्यता दिली.
या कराराला रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट (RELOS) म्हणतात. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यात या हालचालीकडे एक मोठे बदल म्हणून पाहिले जात आहे. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज दोन्ही देशांमध्ये शिखर चर्चा होणार आहे.
Summery
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर
आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट
आज दोन्ही देशांमध्ये होणार शिखर चर्चा
