Russias big gift to India, Putins big decision Donald Trumps tension increases
Russias big gift to India, Putins big decision Donald Trumps tension increases

Russias Big Gift to India : मोठी बातमी! रशियानं दिलं भारताला मोठं गिफ्ट

विशेष म्हणजे ही दोन्ही विमाने पूर्णपणे रशियन तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यामध्ये भारताच्या तिरंग्याची छापही देण्यात आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Russias big gift to India, Putins big decision Donald Trumps tension increases : रशियाने भारतासाठी ‘सुपरजेट-100’ आणि ‘Il-114-300’ ही दोन प्रवासी विमाने देऊ केली आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही विमाने पूर्णपणे रशियन तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यामध्ये भारताच्या तिरंग्याची छापही देण्यात आली आहे. भारताच्या विमान उद्योगाला चालना देण्यासाठी ही मोठी संधी ठरू शकते, असे रशियाचे म्हणणे आहे.

सध्या भारत प्रवासी विमानांसाठी प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहे. मात्र रशियासोबत करार झाल्यास भारताला नवा पर्याय मिळू शकतो आणि दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होऊ शकतात.

दुसरीकडे, रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले आहेत. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढला असून, भारताची निर्यातही घटली आहे. याच काळात भारताचे चीन आणि रशियासोबतचे व्यवहार मात्र वेगाने वाढत आहेत. रशियाकडून विमानांची थेट ऑफर आल्याने अमेरिका अधिक अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. एकूणच, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत नवे पर्याय शोधत असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.

थोडक्यात

  1. रशियाने भारतासाठी दोन प्रवासी विमाने देऊ केली – ‘सुपरजेट-100’ आणि ‘Il-114-300’

  2. दोन्ही विमाने पूर्णपणे रशियन तंत्रज्ञानावर आधारित

  3. विमानांवर भारताच्या तिरंग्याची छाप देण्यात आली

  4. भारताच्या विमान उद्योगाला चालना देण्याची मोठी संधी असल्याचे रशियाचे मत

  5. सध्या भारत प्रवासी विमानांसाठी पाश्चिमात्य देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून

  6. रशियासोबत करार झाल्यास भारताला नवा पर्यायी विमान पुरवठादार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com