या मंत्र्यांना हाकला,नाहीतर चौथी घंटा वाजायला लागेल;सामनातून केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका

या मंत्र्यांना हाकला,नाहीतर चौथी घंटा वाजायला लागेल;सामनातून केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. सध्या अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचा अग्रलेख सामनातून केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या विक्रमी प्रयोगावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की…नाटकाचं काय घेऊन बसलात? आम्ही राज्यात 3 महिन्यांआधीच एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोकं चकीत झाले. त्या महानाट्याचे पदसाह आजही उमतायत. मुख्यमंत्री बरोबर बोलले, अशा शब्दात सामनातून निशाणा साध्यण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार , गुलाब पाटलांसारख्या ' नट ' मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे.

हे कसलं महानाट्य? दिल्लीने महाराष्ट्राच्या माथी मारलेला महादळभद्री प्रयोग आहे, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांवर करण्यात आलीय. तसंच या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्रात स्वाभिमान आणि सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, असा सल्लादेखील सामना अग्रलेखातून देण्यात आलाय. नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल, असा थेट इशाराच सामनातून देण्यात आला आहे.

या मंत्र्यांना हाकला,नाहीतर चौथी घंटा वाजायला लागेल;सामनातून केंद्रासह राज्य सरकारवर सडकून टीका
५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार का?; शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय
Lokshahi Marathi
www.lokshahi.com