'खळं लुटणारा गावाकडे...' सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

'खळं लुटणारा गावाकडे...' सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली, खळं लुटणारा गावाकडे आला म्हणत मारकडवाडीतील सभेत भाषण.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाचा घोळ झाल्याचा आरोप माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी केला आहे. मारकडवाडी गावात अभिरूप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, प्रशासनाने गावात जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांची मारकडवाडीत सभा पार पडली. याच सभेला चोख उत्तर देण्यासाठी आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची मारकडवाडी सभा पार पडली. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे.

खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. इंडियातील मोठा चोर राहुल गांधी पण येणार आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर नाव न घेता टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com