Delhi High Court: सद्गुरुंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर दिल्लीच्या उच्च न्यायालयाचा निर्णय
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर जास्त प्रमाणात केला जातो. यामध्ये बनावट आवाज, प्रतिमा आणि व्हिडिओंच्या वाढत्या प्रसारावर लक्ष देत, दिल्ली उच्च न्यायालया High Courtने शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, सोशल मिडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन सद्गुरूंच्या नावाने बनवलेला कोणाताही AI कंटेंट Content त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सद्गुरू आणि ईशा फाउंडेशन Isha Foundation यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशाआधी अनेक तक्रारी येत होत्या की, AI च्या सहाय्याने सद्गुरूचे बनावट आवाज, फोटो आणि व्हिडिओ Video तयार करून सोशल मीडिया Social Mediaवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहेत. या बनावट कंटेंटचा वापर जनतेला फसवण्यासाठी, बनावट गुंतवणूक योजनांचा प्रचार करण्यासाठी आणि यूट्यूब Yotube व इतर चॅनेल्सवरील सदस्यसंख्या वाढवण्यासाठी केला जात होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमेचा वापर फसवणुकीसाठी किंवा गैरवापरा missuse साठी केला जाऊ शकत नाही.
ईशा फाउंडेशनकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
ईशा फाउंडेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Social Media Plantform X वर प्रतिक्रिया देताना न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, "या प्रकारचे बनावट कंटेंट Content केवळ सद्गुरूंच्या प्रतिमेला हानी पोहोचवत नाहीत, तर सामान्य लोकांना फसवणुकीचा धोका निर्माण करतात." फाउंडेशनने अशा कंटेंटवर कारवाई करण्यासाठी आणि लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
ईशा फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, "हा निर्णय डिजिटल युगात सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."