ताज्या बातम्या
सागरिका-झहीरने केलं गोंडस बाळाचं स्वागत; चाहत्यांना दिली मुलाच्या जन्माची बातमी
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांनी चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत केलं
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांनी चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत केलं. त्यांनी आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सागरिका आणि झहीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज दिली असून त्यांनी चिमुकल्याचा फोटोही शेअर केला आहे. सोबतच त्यांनी आपल्या बाळाचं नाव जाहीर केले असून फतेहसिंग असे दोघांनी आपल्या मुलाचं नाव ठेवल्याचं दिलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. सागरिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.