सह्याद्रीच्या पर्वत रांगातून झिरपणाऱ्या पाण्याचा वीज गृहाला किंवा डोंगराला धोका नाही- दिपक मोडक
निसार शेख| चिपळूण: कोयना प्रकल्पाच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टावर मधून जे अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघतं या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जातं. ही सर्ज वेल 1960 साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात 100 मीटर खोल खोदलेली आहे आणि त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे. ही विहीर गेली साठ वर्ष तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत.
मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेल मधून हे झिरपलेल पाणी इमर्जन्सी व्हॅाल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयार यामध्ये जातं आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडतं. वीज ग्रहाला जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही केवळ पाणी वाया जातो आहे एवढेच नुकसान आहे. हे पाणीसाधारण तीन घनफूट प्रति सेकंद एवढं असावं. उपळी सर जेवेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सहज सोपं नाही.
दुरुस्तीसाठी वीज निर्मिती बंद ठेवावी लागेल आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे या सर्व कारणामुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळलेलं आहे. यात घाबरण्यासारखी किंवा गोंधळल्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही असा खुलासा निवृत मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी केला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून पाणी झिरपत असल्याची बातमी सर्व वृत वाहिनीवर सुरू होती त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती त्यावर दीपक मोडक यांनी खुलासा केला आहे