Saif Ali Khan: सैफ अली खान हल्ला प्रकरणी नवी अपडेट, पश्चिम बंगालमधील महिलेला अटक
सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे, यादरम्यान अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच आता या हल्ल्याप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेस्ट बंगालमधील नादिया जिल्ह्यातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस वेस्ट बंगालमधील नादिया जिल्ह्यातील छपरा गावी चौकशीसाठी पोहचली होती. त्यावेळी ज्या महिलेला अटक करण्यात आले होते तिचे नाव खुखुमोनी जहांदीर शेख असे आहे. बांग्लादेशी हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहाजाद वापरत असलेलं सिमकार्ड महिलेच्या नावाने रजिस्टर होतं.आता महिलेला मुंबईत आणण्यासाठी ट्रांजिट रिमांडची मागणी करण्यात येऊ शकते.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली. सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी अज्ञात इसमाने हल्ला केला. बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील राहत्या घरी त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकूचे ६ घाव होत्या. सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यात २ जखमा फार खोलवर झाल्या होत्या. तर सोमवारी त्याला रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात येणार आहे. सैफच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.