मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे यांना जामीन मंजूर
Admin

मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे यांना जामीन मंजूर

काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ते शितल मात्रे यांचा कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ते शितल मात्रे यांचा कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आला होता.त्या प्रकरणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते साईनाथ सुर्वे यांच्या सह आणखीन सात जणांना अटक करण्यात आले होते.

सातही शिवसैनिकांना याआधी सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले होते.यावेळी बोरिवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह इतर सहा आरोपींना जामीन मंजूर केला.

न्यायालयाने या सातही संशयितांना जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती पालन करण्यात सांगितले आहे. या अटी-शर्ती पाळल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. याशिवाय सोशल मीडिया न वापरणे आणि मुंबई बाहेर न जाण्याच्या अटींवर संशयितांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com