Saint Nivrittinath Maharaj Palkhi : आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Admin

Saint Nivrittinath Maharaj Palkhi : आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जवळपास 25 हजाराहून अधिक वारकरी, भाविक या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे समजते. यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरांतील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. विविध गावांवरून, ठिकाणावरून पंचवीस हजारावर वारकरी दिंडीच्या मार्गात सामील होत असतात.

जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी 12 फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे पाच टँकर प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com