Saju Malik NCP Candidate
Saju Malik NCP CandidateSaju Malik NCP Candidate

Saju Malik NCP Candidate : मुंबई निवडणुकीत NCP कडून कुख्यात गुन्हेगाराला उमेदवारी, खंडणीसारखे 19 गुन्हे

Gangster Nominee : आता NCP अजित पवार गटाकडून कुख्यात गँगस्टरला उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्र. 109 मधून सज्जू मलिकला उमेदवारी देण्यात आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

NCP First BMC Candidate list : राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलाच डाव टाकत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 37 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षाकडून एकूण 100 उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 37 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अशातच आता NCP अजित पवार गटाकडून कुख्यात गँगस्टरला उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्र. 109 मधून सज्जू मलिकला उमेदवारी सज्जू मलिकवर हत्या, खंडणीसारखे 19 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या यादीतील उमेदवार

या पहिल्या यादीत शहरातील विविध वॉर्डमधून अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात मनिष दुबे, सिरील डिसोझा, अहमद खान, बबन मदने, सुभाष पाताडे, सचिन तांबे, आयेशा खान, सज्जू मलिक, शोभा जाधव, हरिश्चंद्र जंगम, अक्षय पवार, ज्योती सदावर्ते, रचना गवस, भाग्यश्री केदारे, सोमू पवार, कप्तान मलिक, चंदन पाटेकर, दिशा मोरे, सबिया मर्चंट, विलास घुले, अजय विचारे, हदिया कुरेशी, ममता ठाकूर, युसूफ मेमन, अमित पाटील, धनंजय पिसाळ, प्रतीक्षा घुगे, नागरत्न बनकर, चांदणी श्रीवास्तव, दिलीप पाटील, अंकिता द्रवे, लक्ष्मण गायकवाड, डॉ. सईदा खान, बुशरा मलिक, वासंथी देवेंद्र, किरण शिंदे आणि फरीन खान यांचा समावेश आहे.

इतर पक्षांचीही तयारी अंतिम टप्प्यात

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही इच्छुक नाराज झाले आहेत. त्यातील काही जण अजित पवार गटात प्रवेश करत असल्याचेही दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.

थोडक्यात

  • महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू, राजकीय हालचालींना वेग.

  • मुंबई महापालिकेसाठी अजित पवार नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

  • पहिल्या टप्प्यात 37 उमेदवारांना संधी; एकूण 100 उमेदवार रिंगणात उतरवण्याची योजना.

  • राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार.

  • पहिल्या यादीत कुख्यात गँगस्टर सज्जू मलिक यालाही उमेदवारी देण्यात आली.

  • सज्जू मलिक वर वॉर्ड क्र. 109 मधून हत्या, खंडणीसह 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • या उमेदवारीमुळे राजकीय चर्चेत आणि सोशल मीडियावर मोठा गदारोळ.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com