Salim Khan Health Update
Salim Khan Health Update

Salim Khan Health Update : बॉलिवूडचे ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्यावर लिलावतीमध्ये अँजिओग्राफी; प्रकृती स्थिर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Salim Khan Health Update) बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सलीम खान यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सलीम खान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सलीम खान यांच्यावर आता लीलावती रुग्णालयात अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. न्यूरोसर्जन डांगे यांनी डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Summary

  • सलीम खान यांच्यावर अँजिओग्राफी

  • सलीम खान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • उपचारासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com