Sikandar on OTT Soon : मल्टिप्लेक्सवर फ्लॉप, सिंगल थिएटरमध्ये गर्दी; आता ओटीटीवर येणार
ईदच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित झालेला साजिद नाडियालवाला सलमान खान अभिनीत सिकंदर चित्रपट चित्रपटगृहांमध्ये सपशेल आपटला असून आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. येत्या काही आठवड्यात ‘सिकंदर’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून ११ मे किंवा २५ मेपासून सलमान खानचा हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. पण ‘सिकंदर’ चित्रपटाची ओटीटीवर प्रदर्शनाची ही तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.
बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची जादू फिकी पडली. २०० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त २६ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत किचिंत वाढ झाली. पण चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. ‘सिकंदर’ने चौथ्या दिवशी ९.७५ कोटींचा गल्ला जमवला. तेव्हापासून या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये ‘सिकंदर’ने फक्त ९७.५० कोटींचं कलेक्शन केलं आहे.