मुख्यमंत्री शिंदे हे सुद्धा त्यांच्या दाढीला कात्री लावतील काय? गुळगुळीत दाढी करतील काय? सामनातून सवाल
Admin

मुख्यमंत्री शिंदे हे सुद्धा त्यांच्या दाढीला कात्री लावतील काय? गुळगुळीत दाढी करतील काय? सामनातून सवाल

शिवसेनेने राज्यात कालपासून (30मार्च) पासून सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे.

शिवसेनेने राज्यात कालपासून (30मार्च) पासून सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या यात्रेवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनातून म्हटले आहे की, सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढायाची तर काढा. पण त्याआधी त्यांना भारतरत्न तर द्या. भारतरत्न पुरस्कार हाच सावरकरांचा खरा गौरव ठरेल. बाळासाहेब ठाकरे यांना तर धर्माचे राजकारण मान्य नव्हते. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. पण सध्या महाराष्ट्राचे राजकारण खोमेनीच्या मार्गानेच सुरू आहे. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच विनायक दामोदर सावरकर यांना दाढीचा अत्यंत तिरस्कार होता. सावरकरांना मान्य नसलेल्या दाढीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या दाढीला कात्री लावतील काय? गुळगुळीत दाढी करतील काय? असा सामनातून सवाल विचारण्यात आला आहे. ज्यांनी कधी सावरकरांच्या साहित्याची चार पाने चाळली नाहीत, ते आता सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com