‘मिशन नो पेंडन्सी’च्या नावाखाली देवेंद्र महोदय फायली क्लीअर करताना; सामनातून हल्लाबोल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं होते. त्यांनी कार्यालयात काम करतानाचा फोटो ट्विट केला आहे आणि कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असे लिहिले आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी हा फोटो ट्विट केलं होते.
त्यांच्या या ट्विटवरुन सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले आहे की, टेबलावर फायलींचा ढिगारा असून ‘मिशन नो पेंडन्सी’च्या नावाखाली देवेंद्र महोदय फायली क्लीअर करताना त्या छायाचित्रात दिसत आहेत. “भारतीय जनता पक्ष व त्यांचे पुढारी एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत. असे म्हटले आहे.
तसेच अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय? तेवढे काय ते बोला”,“फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत व अकोल्याची जनता एक-एक घोट पाण्यासाठी तडफडत आहे. खारे पाणी, जे विषारी आहे ते पिऊन दिवस ढकलत आहे. असे सामनातून म्हणत हल्लाबोल करण्यात आला आहे.