ताज्या बातम्या
Sambhaji Bhides Controversial Statement : संभाजी भिडे यांची शरद पवारांवर तीव्र टीका; राजकीय वर्तुळात खळबळ
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडणारं वक्तव्य केलं आहे. कर्जत येथे गड-किल्ले मोहिमेसाठी आले असताना त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडणारं वक्तव्य केलं आहे. कर्जत येथे गड-किल्ले मोहिमेसाठी आले असताना त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
भिडे यांनी यावेळी शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका करत राज्य आणि देशाच्या हिताला धक्का देणारे आरोप केले. याआधीही त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या बोलण्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
