2024 मध्ये स्वराज पक्ष निवडणुका लढाविणार,समविचारी पक्षाशी युती करणार - संभाजीराजे छत्रपती
Admin

2024 मध्ये स्वराज पक्ष निवडणुका लढाविणार,समविचारी पक्षाशी युती करणार - संभाजीराजे छत्रपती

2024 मध्ये स्वराज पक्ष निवडणुका लढाविणार,समविचारी पक्षाशी युती करणार - संभाजीराजे छत्रपती

बालाजी सुरवसे, उस्मानाबाद

लोकांना स्वराज्य संघटनेकडुन मोठ्या अपेक्षा असुन त्या पुर्ण करण्यासाठी स्वराज्य संघटना २०२४ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उस्मानाबादमध्ये बोलताना दिली आहेत.फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवीन्यासाठी समविचारी पक्ष यांच्याशी युती करणार असुन त्यासाठी आपण खुले आहोत. इतर राज्याप्रमाने महाराष्ट्रमधील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळाली पाहिजे.

आरोग्यमंञी सावंत यांच्या परंडा मतदार संघात संभाजीराजे यांनी ५८ शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. दरम्यान मतदार संघात गावोगावी जावुन लोकांच्या समस्या जाणुन घेण्याचा संभाजीराजे प्रयत्न करत आहेत त्यामुळे आगामी काळात आरोग्य सावंत यांच्या विरोधात परंडा मतदार संघातुन ते निवडून लढणार का अशा चर्चेला जिल्ह्यात उधाण आलय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com