Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजे छत्रपतींनी केलं जाहीर आवाहन, पत्रकार परिषदेत म्हणाले, "सर्व शिवभक्तांनी..."

"हा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत"
Published by :

Sambhajiraje Chhatrapati Press Conference : २००७ पासून शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. २००७ ला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी २ हजार शिवभक्त आले होते. मागच्या वर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याला ५ लाख शिवभक्तांनी उपस्थिती लावली. हे फार आव्हानात्मक काम आहे. हा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना आवाहन करतो की, या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शिवाजी महाराजांना आनंदाने वंदन करा. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी यावं, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

संभाजीराजे पुढे म्हणाले, दरवर्षी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार असतील सर्वांना आम्ही निमंत्रण पाठवतो. पण यावेळी लोकसभेची पळापळ असल्याने विदेशातील पाहुण्यांना बोलावणे शक्य झालं नाही. २०२३ ला ३५० वा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली. यावर्षी या सोहळ्याची वर्षपुर्ती आहे.

यावर्षीचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा दिमाखात साजरा करण्याचं शिवराज्याभिषेक समितीने आणि सर्व शिवभक्तांनी ठरवलं आहे. यासाठी मला सर्व शिवभक्तांचं आभार व्यक्त करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडला झाला. तो लोकोत्सव व्हावा, तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, यासाठी सर्व शिवभक्तांनी आणि समितीने प्रयत्न केला, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com