Sameer Wankhede, Kranti
Sameer Wankhede, Kranti Team Lokshahi

समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला Video; म्हणाली 'पापाचा घडा…'

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक उपरोधिक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने कोणाचंही नाव न घेता सद्यस्थितीवर उपरोधिक टोला लगावला आहे.
Published by :
shweta walge

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या कॉर्डेलिया ड्रग्ज क्रूज प्रकरणी एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरु आहे. यावरच आता त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक उपरोधिक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने कोणाचंही नाव न घेता सद्यस्थितीवर उपरोधिक टोला लगावला आहे.

व्हिडीओमध्ये क्रांती रेडकर म्हणते की, माझ्या आज्जीने मला एक गोष्ट सांगितली होती. कलियुगातील गोष्ट. कलियुगात खोटं आहे, दिखावा आहे, छळ, कपट आहे. ती म्हणायची इथं लोक चांगुलपणाला टिकू देत नाही. जे लोक चांगलं काम करतात त्यांना दाबणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण जेव्हा चांगली कामं करणाऱ्या लोकांना दाबून दाबून, त्रास देऊन त्यांना जेव्हा तोललं जाईल तेव्हा पापाचा घडा भरत जाईल. आणि ज्या दिवशी हे वाईट लोक पापाचा घडा भरतील तेव्हा शिव भगवानला पृथ्वीवर यावं लागेल आणि ते प्रलय करतील.

पुढे म्हणते की, भगवान शिव प्रलय करणारच होते, तेवढ्यात श्रीराम येतात आणि म्हणतात भगवान शिव तुम्ही येथे प्रलय करू नका कारण तुम्ही प्रलय केलात तर ही जी चांगली लोकं राहिली आहेत, ज्यांच्या चांगुलपणामुळे जग चालतंय तेही संपून जाईल. आणि चांगुलपणा पराभूत होईल. मग भगवान शिव म्हणतात की प्रलयचा प्लान कॅन्सल.

पुढे ती म्हणते की, “म्हणायचा उद्देश एवढाच आहे की, ही जी दुनिया चालतेय ती चांगुलपणावर चालेतय. खूप कमी लोक आहे जे हे जग चालवाहेत. आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे. मी चांगुलपणासोबत चालणार आहे. तुम्हीही चालणार आहात का? विचार करा.”

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com