समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार - भागवत कराड

समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार - भागवत कराड

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास माने ,बीड

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाकांशी असणा-या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान यावर भाजपचे मंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिलीय. समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्याला सोयी मिळणार असून हा महामार्ग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आणि यामुळे विकासाला गती देखील मिळणार आहे. दरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मात्र कराड यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. बीडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त मंत्री भागवत कराड, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे अतुल सावे हे एकत्रित आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com