Samsung Galaxy M36 5G : 120Hz सॅमोलेड डिस्प्ले; AI फिचर्ससह सॅमसंग गॅलेक्सी M36 5G भारतात लाँच

Samsung Galaxy M36 5G : 120Hz सॅमोलेड डिस्प्ले; AI फिचर्ससह सॅमसंग गॅलेक्सी M36 5G भारतात लाँच

सॅमसंगने भारतात Samsung Galaxy M36 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला
Published by :
Team Lokshahi
Published on

सॅमसंगने भारतात Samsung Galaxy M36 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून, यामध्ये 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आणि Exynos 1380 चिपसेटचा समावेश आहे. हा फोन Android 15 वर आधारित OneUI 7 प्रणालीवर कार्य करतो.

सॅमसंगने त्यांच्या M-सिरीजमध्ये आणखी विस्तार करत Galaxy M36 5G लाँच केला आहे. यामध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. डिव्हाइसला 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा हँडसेट गेल्या जुलैमध्ये लाँच झालेल्या Galaxy M35 5G चा नवा आणि सुधारित पर्याय ठरतो.

Galaxy M36 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट भारतात 22,999 रुपये किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 16,499 रुपयांमध्ये काही निवडक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मिळू शकतो. हा हँडसेट Orange Haze, Serene Green आणि Velvet Black अशा तीन आकर्षक रंगांत मिळेल. 12 जुलै 2025 पासून तो Samsung India च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon वरून खरेदी करता येईल.

Samsung Galaxy M36 5G मध्ये 6.7-इंचाचा Full HD+ Super AMOLED स्क्रीन असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याला Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच डिझाइन वापरले गेले आहे, जे मागील Galaxy M35 मधील पंच-होल कटआउटपेक्षा वेगळं आहे. या फोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसरसह 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. कॅमेरा विभागात 50MP OIS मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो आणि 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. सॉफ्टवेअरबाबत Galaxy M36 5G मध्ये Android 15 आधारित OneUI 7 वापरले गेले असून, 6 वर्षांचे OS अपडेट्स यामध्ये मिळणार आहेत.

एआय-संचालित फिचर्स

Galaxy M36 5G मध्ये सॅमसंगने AI-आधारित फिचर्सचा भरणा केला आहे. यामध्ये Google Gemini, Circle to Search, Gemini Live, Object Eraser, Image Clipper, Edit Suggestions, AI Depth Map आणि AI Select यांचा समावेश आहे. हे फिचर्स फोटो संपादन, व्हिज्युअल शोध आणि स्मार्ट युजर इंटरफेस अधिक सुलभ करतात.

एकंदरीत, Samsung Galaxy M36 5G हा स्मार्टफोन प्रीमियम फीचर्स आणि AI टेक्नोलॉजीसह 20-25 हजारांच्या बजेटमध्ये एक मजबूत पर्याय ठरत आहे.

हेही वाचा

Samsung Galaxy M36 5G : 120Hz सॅमोलेड डिस्प्ले; AI फिचर्ससह सॅमसंग गॅलेक्सी M36 5G भारतात लाँच
India vs Pakistan : धक्कादायक! चीनकडून मिळतेय भारताविषयीची गुप्त माहिती; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची कबुली
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com