MNS : 'भाजपनेही आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का?' मनसेच्या 'या' नेत्यांचा भाजपवर सवाल
थोडक्यात
महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडूनकाल सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सवाल उपस्थितीत केला आहे.
Sandeep Deshpande : (MNS- MVA Mumbai Morcha) निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेतील घोळाविरोधात विरोधकांनी काल महाएल्गार पुकारला . महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडूनकाल सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.या मोर्चातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक आरोप केले आहेत.
मोर्चात हजारो समर्थक सामील झाले होते. या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. आता 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, "आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे पण भाजपने देखील आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे."
