Sandeep Deshpande : "तुम्ही दडपशाही कराल तर...",संदीप देशपांडे यांचा सरकारला थेट इशारा

Sandeep Deshpande : "तुम्ही दडपशाही कराल तर...",संदीप देशपांडे यांचा सरकारला थेट इशारा

मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याचा संदीप देशपांडे यांचा निषेध
Published by :
Team Lokshahi
Published on

राज ठाकरे यांच्या विरोधात मीरा भाईंदर मध्ये काढलेल्या मोर्चाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आता मनसे सज्ज झाली असून मनसे नेत्यांनी उत्तराला प्रतिउत्तर देण्यसाठी त्यांचेच हत्यार वापरत मोर्चा काढण्यात आला. मात्र यावेळी दडपशाहीचे धोरण स्वीकारत असंख्य आंदोलकांला पोलिसांनी ताब्यात घेतले, यामुळे महाराष्ट्राचे वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर मुख्यमंत्र्यांनाच सडेतोड उत्तर देत सरकारला परवानगी द्यायची नव्हती म्ह्णून आम्हाला घोडबंदर ला मोर्चा काढा असा पर्याय सुचवला. सरकारला हे प्रकरण पेटवायचे आहे असा थेट आरोप यावेळी संदीप देशपांडे यांनी केला.

आजच्या मिरभाईंदरच्या मोर्चा प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्ही काहीही झाले तरी मोर्चा काढणारच असा इशारा सरकारला दिला. या मोर्चासाठी पोलिसांनी ज्या प्रकारे वागणूक दिली, आमच्या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली त्याचा निश्चितच निषेध आहे. गुजराती लोकांना तुम्ही परवानगी देता मात्र आम्हाला परवानगी नाकारता? उलट आम्हाला सांगता घोडबंदर इथे मोर्चा काढा.... राज ठाकरेंविरुद्ध मोर्चा हा मीरा भाईंदरमध्येच झाला होता तर त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही मोर्चा इथेच काढणार ना... घोडबंदरला काढून काय फायदा ? उद्या तुम्ही आम्हाला कणकवलीला मोर्चा काढायला सांगाल... आम्ही जिथे घटना घडली तिथेच मोर्चा काढणार आम्ही रस्त्याचा मार्ग बदलू शकतो मात्र मीरा मीरा भाईंदरचा मोर्चा आम्ही घोडबंदरला काढायचे धंदे आम्ही करणार नाही.

याचा सरळ अर्थ होतो की पोलिसांना या मोर्चा साठी परवानगी द्यायची नव्हती. पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होत .. असा संशय आम्हाला येतोय. आमचा शांतनेने मोर्चा निघणार होता तर आम्हाला परवानगी का दिली गेली नाही.महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मोर्चासाठी परवानगी दिली जात नाही आणि गुजराती माणसाच्या मोर्चाला परवानगी दिली जाते म्हणजे सरकार गुजरातचा आहे का महाराष्ट्राचा आहे ? असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी यावेळी केला.

आमचे केवळ असे म्हणणे आहे कि आम्ही मोर्चा शांततेत काढू, लोकशाही मार्गाने काढू... मात्र जर तुम्ही दडपशाही कराल तर आजच्या सारखे सगळे उत्स्फूर्तपणे मीरारोडला जातील आणि त्यात जर काही झाले आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल.महाराष्ट्राचा सैनिक जिथे अन्याय दिसेल तिथे उत्स्फूर्तपणे जातो असे ही ते यावेळी म्हणाले. याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्या मोर्च्यातील सहभागाबद्दल विचारले असता त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी अन्यायाविरुद्ध एकवटलेच पाहिजे. मग ते कोणी मंत्री असो कि आमदार किंवा मुख्यमंत्री असो त्यांनी मराठीसाठी एकत्र आले पाहिजे असे बोलून त्यांनी प्रताप सरनाईक यांचे या मोर्च्यात स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज साहेबांना याबद्दल सर्व कल्पना दिलेली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com