Hemant Kshirsagar Join BJP
Hemant Kshirsagar Join BJPHemant Kshirsagar Join BJP

Hemant Kshirsagar Join BJP : संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर

भाजप प्रवेश: हेमंत क्षीरसागर भाजपात, बीडच्या राजकारणात बदलाची शक्यता.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील नगरपालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच बीडच्या क्षीरसागर घराण्यात पुन्हा एकदा फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हेमंत क्षीरसागर यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विकासाचा अजेंडा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आजवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत राहिलेले हेमंत क्षीरसागर आता भाजपात जाणार असल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com