Sandeep Naik : संदीप नाईकांची भाजपात घरवापसी; नवी मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ

Sandeep Naik : संदीप नाईकांची भाजपात घरवापसी; नवी मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ

माजी आमदार संदीप नाईक यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

माजी आमदार संदीप नाईक यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. संदीप नाईकांच्या या घरवापसीमुळे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता भाजपात पुनरागमन केल्यामुळे गणेश नाईकांची राजकीय ताकद अधिक बळकट होणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संदीप नाईकांची घरवापसी भाजपसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com