ताज्या बातम्या
Sushma Andhare Vs Sanjay Kenekar : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर संजय केणेकरांची घणाघाती टीका; आता सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर
संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती, त्यांच्या या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिल आहे.
आचारसंहिता लागू असताना उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर गेले. यावेळी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आहे. धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला होता. यावेळी भाजपनेते संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती, त्यांच्या या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिल आहे.
