Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावरुन संजय निरुपम आणि शंभुराज देसाई यांच्यामध्ये जुंपली
सध्या राज्यात दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिशाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूची खोलवर चौकशी व्हावी अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. मुलीची आत्महत्या नसून तिच्यावर अत्याचार झाला आणि तिची हत्या झाली आहे असा आरोप दिशांच्या वडिलांनी याचिकेमध्ये केला आहे. आशातच दिशाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला.
दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. यावरुन शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले की, "दिशाच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतर तिच्या पोस्टमॉर्टेमची प्रक्रिया सुरु झाली. या सर्व प्रक्रियेमध्ये तीन दिवसांचा कालावधी गेला. ही अत्यंत चुकीची बाब आहे".
संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शंभुराजे देसाई यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. शंभूराजे देसाई म्हणाले की, 'याप्रकरणी SIT तपास करत आहे. या सर्व प्रकरणाचा अंतिम रिपोर्ट अजून समोर आला नाही. मात्र या गरज पडली तर पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांचीदेखील चौकशी केली जाईल".