Sanjay Raut On Ravindra Waikar : 'माझ्यात तुरुंगात जायच बळ नाही, मला आत्महत्या करावी लागेल'; राऊतांचा वायकरांबाबत गौप्यस्फोट
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या त्यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. कधी पुस्तकातील मुद्द्यांमुळे तर कधी विरोधकांनी त्यांच्यावर गेलेल्या टीकांमुळे. संजय राऊतांनी आता शिंदे गटातील नेते रविंद्र वायकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी रविंद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली. याबाबतची माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, "रविंद्र वायकर आणि त्यांचे कुटुंबिय मातोश्रीवर येऊन रडले. माझ्यात तुरुंगात जायच बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचे धैर्य देखील नाही,' असं वायकर म्हणाले. वायकर हे हार्ट पेशंट आहेत. 'मला आता अटॅक येऊन मी मरून जाईल नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल. तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर असणं बरं,' असे वायकर म्हणाले. वायकरांच म्हणणं ऐकून उद्धव ठाकरेदेखील हतबल झाले. अखेर वायकर शिंदेंसोबत गेले. त्याचक्षणी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते," असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.