नाणार भोवतालच्या जमिनी घेतलेल्यांची नावं जाहीर करा, नाहीतर...; संजय राऊत

नाणार भोवतालच्या जमिनी घेतलेल्यांची नावं जाहीर करा, नाहीतर...; संजय राऊत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकणात भराडी देवीच्या यात्रेला उपस्थित होते.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकणात भराडी देवीच्या यात्रेला उपस्थित होते. त्यांनी तिथे जाहीर सभाही घेतली. यावेळी सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणात नाणार प्रकल्प आणणारच असे त्यांनी म्हटले. यावरुन खासदार संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

नाणारच्या अवतीभवती ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांनी अलीकडच्या काळात घेतल्या आहेत त्या जमिनदारांसाठी नाणार प्रकल्प आणला जात आहे. ही गुंतवणुक कुणाची आहे? ही गुंतवणुक कुठून आली? गुंतवणूकदार कोण आहेत? हा कोणाचा पैसा आहे? नाणारच्या आसपासच्या जमिनीमध्ये कुणाला पैसा गुंतला आहे? ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी जाहीर करावी. ज्यांनी नाणारच्या अवती भवती जमिनी घेतल्या त्यांची नावं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करा. नाहीतर ही यादी आम्ही जाहीर करु. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

यासोबतच काल त्यांनी जे कालं ‘च’ वर जोर देऊन सांगितलं आणणारचं… तेथील जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत कारण एखाद्या उद्योगपतीला किंवा परदेशी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी भाजप ‘च’वर जोर देऊन आणणारचं, करणारचं, असं सांगत आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com