Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात संजय राऊतांची CBI कडे तक्रार

भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात संजय राऊतांनी CBI कडे तक्रार केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात संजय राऊतांनी CBI कडे तक्रार केली आहे. कारखान्याच्या खात्यात असलेले 500 कोटी रुपये कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचं राऊतांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आहेत. माझ्याकडे 17 कारखान्याचे कागदपत्रे आहेत. त्यापैकी राहुल कुल यांचा एक कारखाना आहे. संजय राऊतांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतानाही भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात आरोप केले होते. तसेच, यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सीबीआयकडे तक्रार दाखल केली असे राऊत म्हणाले.

या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com