Sanjay Raut : असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही

Sanjay Raut : असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही

राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले की, त्यांनी जे विधान केलं ते आधी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होते. आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणत आहात त्यानुसार. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवर अनेकदा आलेला आहात. तेच उद्धव ठाकरे, तीच शिवसेना आणि तीच मातोश्री. आपण स्वत: आला होतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी. तेव्हा हीच शिवसेना असली होती. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com