कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, सगळ्यांना भाजपात सामील करणार; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, सगळ्यांना भाजपात सामील करणार; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

ठाकरे गटाचा शिवतीर्थांवर दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यावर टीका करत भाषण केलं आहे.
Published by :
shweta walge

ठाकरे गटाचा शिवतीर्थांवर दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यावर टीका करत भाषण केलं आहे.

इथे मराठा तितुका मेळवावा सुरु आहे. तर तिकडे मराठा तितुका लोळवावा सुरु आहे.

कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, सगळ्यांना भाजपात सामील करणार.

प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ईडीच्या नोटीस दिल्यात आता ते भाजपासोबत आहेत.

दादा भुसे याने 178 कोटी रुपयांची फसवणूक केली, गिरणा साखर कारखाना.. 200 रुपये हडप केले, त्याला उलटे लटकवण्याऐवजी मंत्री केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com