Sanjay Raut
Sanjay RautSanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांचा सरकारवर हल्ला; गोगावलेंचा मुलगा फरार, कायद्याचा ध्वज फडकत नाही

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार, गृहखाते आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे
Published by :
Riddhi Vanne
Published on

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार, गृहखाते आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे. राऊत म्हणाले की, राज्यात कायद्याचा ध्वज फडकत नाही, उलट गुंडांचा राज्य आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही त्यांनी आक्षेप घेतला आणि ते ताटाखालच्या मांजरासमान असल्याचे म्हटले.

राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता धुळीस मिळाली आहे. जर ते लोकशाहीचे आदर्श असले, तर त्यांनी टी.एन. शेषन यांचा फोटो लावावा आणि त्याच पद्धतीने काम करावं." नाहीतर, जनता त्यांना ताटाखालचं मांजर म्हणूनच ओळखेल, अशी टीका त्यांनी केली.

तसेच, महाडमधील आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचा मुद्दा घेत राऊत म्हणाले, "गोगावले यांचा मुलगा खून करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपात महिना-दीड महिना उलटला तरी पोलिसांचा शोध त्याला लागलेला नाही. इतर गुन्हेगार पकडले जातात, पण आमदाराचा मुलगा का फरार आहे? याचा जाब सरकारला विचारला पाहिजे."

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकारणाच्या बदलेल्या चेहऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले, "फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या थरावर गेले आहे, हे पाहावे. सरकारमध्ये गुंड आणि खुनी असतात."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com