Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

"पाठिंबा दिल्याबद्दल आभार..."; संजय राऊतांचं कोठडीतून पत्र

संजय राऊत यांनी नुकतंच काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संजय राऊत यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्यावर पत्राचाळ प्रकरणात पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. शिवसेनेची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊतांनी ईडी कोठडीत गेल्यानंतरही लिहीणं थांबवलेलं नाही. संजय राऊत यांनी नुकतंच काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा लढा आपण त्यांनी या पत्रात हा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे की, हा लढा ते नक्कीच जिंकतील.

Sanjay Raut
मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल

संजय राऊतांनी पत्रात काय लिहीलंय?

असं म्हटलं जातं की, कठीण काळात तुम्हाला कळतं की, तुमचे खरे मित्र कोण आहेत. केंद्रीय यंत्रणांमार्फत केंद्र सरकारने माझ्यावर केलेल्या राजकीय कारवाईनंतर तुम्ही मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमचा खरोखर आभारी आहे. मी खरंच तुमचा कृतज्ञ आहे. योग्य गोष्टींसाठी माझा लढा सुरूच राहील. दबावापुढे मी झुकणार नाही किंवा हा लढा लढण्याचा माझा संकल्प सोडणार नाही. वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे जी नेहमी म्हणायचे, 'रडू नका, लढा' बरोबर काय ना'. तुमच्या शब्दांतून, तुमच्या कृतीतून आणि तुमच्या विचारांतून मला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचं आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहीतोय. संसदेच्या आत आणि बाहेर ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, त्या सर्वांचे आभार. मला विश्वास आहे की वेळ आणि संयम हे सर्वात मोठं योद्धे आहेत, या विचाराने, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने, उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय आणि शुभचिंतक यांच्या पाठिंब्याने, आपण सर्वजण लवकरच या लढ्यात विजयी होऊ. जय महाराष्ट्र! लवकरच भेटू...!

Lokshahi
www.lokshahi.com