भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र

भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र

कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी हे पत्र सोशल मिडियावर देखिल शेअर केले आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे. असे म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com