मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार? संजय राऊत यांनी बोलता बोलता सर्वच सांगितले...
Admin

मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार? संजय राऊत यांनी बोलता बोलता सर्वच सांगितले...

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी दिल्लीत राहुल गांधींना भेटलो होतो. सोनिया गांधी यांनाही भेटलो होतो. त्यांना मुंबईत येण्यास सांगितलं होतं. राहुल गांधी लोकप्रिय नेते आहेत. खरगे यांच्याकडून संपूर्ण काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना भेटायला वेणूगोपाल येणार आहेत. त्या भेटीत अनेक गोष्टी ठरतील असे राऊत म्हणाले.

तसेच या देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून एकत्र येण्यासाठी राहुल गांधी काम करत आहेत. विरोधक एकत्र येऊ नये असा भाजपचा भ्रम आहे, तो तुटणार आहे. 2024ला विरोधक एकत्र येतील. सोमवारी 5 तारखेला खरगे यांच्याकडून काँग्रेस नेते महासचिव केसी वेणूगोपाल मुंबईत येत आहेत. ते उद्धव ठाकरे यांना भेटतील. त्यानंतर खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी भेट होऊ शकते. यासोबतच ते म्हणाले की, महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com