Sanjay Raut : अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर, बदल्याच्या भावनेनं आणि घाबरून खोट्या केसमध्ये अटक केली

Sanjay Raut : अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर, बदल्याच्या भावनेनं आणि घाबरून खोट्या केसमध्ये अटक केली

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावनाने आणि घाबरून खोट्या केस मध्ये अटक केली आहे. हे सर्व जण जाणत आहेत. विश्वगुरू देखील जाणत आहेत. आज देशात कोणीही सुरक्षित नाही आहे. कोणालाही अटक होऊ शकते.

जंगल राज सुरू आहे. जसे पुतीन आणि चायना मध्ये सुरू आहे तसे इथे देखील सुरू आहे. केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. तिथे भाजप 5 च्या वर गेले नाही. जेलमध्ये राहून देखील काम करू शकतात. केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणले भारतीय जनता पार्टीने, ईडी सीबीआय यांनी त्यांना निवडून आणलं नाही आहे.

कंसाला ज्यांची ज्यांची भिती वाटत होती त्या सगळ्यांना त्याने तुरुंगात टाकले होते. या देशाची परिस्थिती पण त्याच पद्धतीची आहे. आमच्या कंस मामाला सर्वांची भिती वाटते आणि ज्याची भिती वाटते आहे. त्या सगळ्यांना तो तुरुंगात टाकतो आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com