Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshah

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनाच निमंत्रण नसेल तर...; संजय राऊत

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले की, पंतप्रधान नंतर येतात. लोकसभेचे अध्यक्ष नंतर येतात. प्रत्येक गोष्टीचं निवडणुकीकरता राजकारण करायचं आणि फक्त मी, मी आणि मीच करायचं. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनाच निमंत्रण नसेल तर ही गंभीर बाब नाहीय तर हास्यास्पद आहे.

या देशाची संसद अजून १०० वर्षे चालली असती. आपल्यापेक्षाही जुन्या इमारती जगामध्ये आहेत. राष्ट्रपतींना डावलून संसदेचं उद्घाटन होतंय, ही लोकशाही चिंतेची गोष्ट आहे. संसदभवनाचं उद्घाटन देशाच्या राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हायला हवं. असे राऊत यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com