राज्याची कायदा-सुव्यवस्था काहींच्या कोठ्यावर नाचतेय; संजय राऊतांचा हल्लाबोल

राज्याची कायदा-सुव्यवस्था काहींच्या कोठ्यावर नाचतेय; संजय राऊतांचा हल्लाबोल

पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .

पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत होती. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईचा मागणी केली होती.

राऊत यांनी ट्विट करुन म्हटले होते की, देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.

गुन्हा दाखल केल्याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे राऊत म्हणाले की, माझे काय चुकले. या मुलीची आई माझ्याशी बोलली, तिच्या आईनं आक्रोश करत सरकारकडे ‘जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छामरणाची परवानगी द्या’असे ती म्हणाली. ‘माननीय मुख्यमंत्री या मुलीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका’ इतकंच म्हटलं. एवढंच मी म्हणालो. एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो.राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय हे या प्रकारावरुन दिसून येत आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com