दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु - संजय राऊत
शिंदे गट ठाकरे गटाचे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, भाजपाला जे हवं आहे ते साध्य करण्यात शिंदे अपयशी झाले आहेत. शिंदेमुळे भाजपा रसातळाला चालला आहे. मंत्रालयात एकही मंत्री जात नाही. आमची मशाल भाजपाला खाक करेल. असे राऊत म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, भाजपा हे देशभरातील मजबून पक्षांना तोडण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी तुटणार नाही. 15 दिवसांत सरकार पडणार यावर मी ठाम आहे. सरकार जास्त दिवस चालू नये, हाच भाजपाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु झाल्या आहेत. असे राऊत म्हणाले.